Tue, Jul 16, 2019 10:10होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादी लिंगायत समाजासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आमदार मुश्रीफ

राष्ट्रवादी लिंगायत समाजासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आमदार मुश्रीफ

Published On: Jan 28 2018 11:07AM | Last Updated: Jan 28 2018 1:14PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

लिंगायत धर्माला मान्यता मिळावी यासाठी आणि समाजाच्या क्रांतिसाठी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीतर्फे आवाज उठविणार, असे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले. लिंगायत समाजातर्फे आयोजित महामोर्चात ते बोलत होते. समाजात बाराव्या शतकात क्रांतिकारी विचार बसवण्णांनी मांडला तसेच शांततेचा विचार मांडणार्‍या लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळालायच पाहिजे, असे आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले. 

धर्माचा दर्जा द्यावा आणि केंद्र सरकारकडून अल्पसंख्यांक म्हणून मान्यता मिळावी या मागण्यांसाठी लिंगायत समाजाने आज मोर्चाचे आयोजन केले आहे. करवीर नगरीतील सर्वच दिग्गज नेते या मोर्चाला उपस्थित असल्याचे पाहून ‘सगळेच लिंगायत समाजाच्या सोबत आहेत, चिंता करायची आवशक्यता नाही असे खासदार धनंजय महाडीक म्हणाले. लिंगायत समाजासाठी लोकसभेत आवज उठवू असेही ते म्हणाले. या मोर्चाला शाहु घराण्याचा संपूर्ण पाठींबा असल्याचे समरजित सिंह घाडगे यांनी जाहीर केले. 

येत्या अर्थसंकल्पात लिंगायत समाजाची बाजू मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे, आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. तर लिंगायत धर्माच्या मागण्यांसाठी एकत्र लढा देऊ, सर्व आमदार मिळून आवाज उठविणार असे, आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या. 

आज सकाळी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. शहरात सुरू असणाऱ्या या सभेला खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षिरसागर, समरजित सिंह घाडगे, आमदार संध्यादेवी कुपेकर उपस्थित आहेत. 

Live अपडेट

> लिंगायत समन्वय समितीकडून चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले

>लिंगायत समन्वय समितीकडून चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले

>लिंगायत धर्म राज्यव्यापी महामोर्चासाठी खासदार धनंजय महाडीक यांची उपस्थिती

>लिंगायत धर्म राज्यव्यापी महामोर्चासाठी लिंगायत बांधवांची मोठी गर्दी.

>चंदगड, गडहिंग्लज आजर्‍याच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, नंदाताई बाभूळकर यांची हजेरी

>आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती

>लिंगायत धर्म राज्यव्यापी महामोर्चाला शाहू महाराज यांच्या संपूर्ण घराण्याचा पाठिंबा मी जाहीर करतोय. माझाही या मोर्चाला पाठिंबा : समरजित घाटगे 

>शाहूनगरीतील सर्व समाज बांधवांचाही पाठिंबा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

>सगळेच लिंगायत समाजाच्या सोबत आहेत, चिंता करायची आवशक्यता नाही: खासदार धनंजय महाडीक

>लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती

>लिंगायत धर्माला मान्यता मिळावी यासाठी आणि समाजाच्या क्रांतिसाठी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीतर्फे आवाज उठविणार :आमदार हसन मुश्रीफ 

>समाजात बाराव्या शतकात क्रांतिकारी विचार बसवण्णांनी मांडला तसेच शांततेचा विचार मांडणार्‍या लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळालायच पाहिजे : आमदार डॉ. सुजित मिणचेकर

>कोल्हापूर : राजकारणातील सहभागाप्रमाणेच लिंगायत समाजाची सैन्यात रेजिमेंट हवी : सिमरनजितसिंग मान

 

पार्किंगची सोय

या मोर्चाला सर्व समाजांतील नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनांसाठी शहरात आठ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी एस्तेर पॅटर्न हायस्कूल मैदान, सासने मैदान, आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल मैदान, रेल्वेस्टेशन आवार, रंकाळा परिसर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. 

बंदोबस्त 

मोर्चासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने 1,300 पोलिस कर्मचारी नियुक्‍त करण्यात आली. त्यामध्ये दोन अप्पर पोलिस अधीक्षक, 7 पोलिस उपअधीक्षक, 22 पोलिस निरीक्षक, 60 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 900 पोलिस कर्मचारी, 400 होमगार्ड, एसआरपीच्या दोन कंपन्या आदींचा समावेश आहे. 

वाहतूक मार्गात बदल

लिंगायत समाजाच्या मोर्चासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी गोकुळ हॉटेल ते सीपीआर चौक या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक गोकुळ हॉटेलपासून शाहूपुरीमार्गे गवत मंडईकडे वळवण्यात आली आहे. गोकुळ हॉटेल ते दसरा चौक या मार्गाला जोडणार्‍या पोट रस्त्यांचीही वाहतूक बंद करण्यात आली 
आहे.