Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Kolhapur › प्राध्यापकांची भरती गुणवत्तेनुसार केंद्रीय पद्धतीने करण्याची मागणी

प्राध्यापकांची भरती गुणवत्तेनुसार केंद्रीय पद्धतीने करण्याची मागणी

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:34PMकोल्हापूर : प्रतिनिधी
विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापकांची सर्व रिक्त पदांची भरती कायमस्वरूपी पात्रता व गुणवत्तेनुसार केंद्रीय पद्धतीने करावी, यासह अन्य मागण्यांसाठी सीएचबी प्राध्यापक व नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (दि.3) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा न भरण्याच्या शासन धोरणामुळे सीएचबी तत्त्वावर काम करणाच्या प्राध्यापकांची आर्थिक कुचंबणा व ससेहोलपट होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे एक हजार व राज्यात दहा हजार प्राध्यापकांची पदे ही सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती करावी. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियमानुसार वेतन द्यावे. राज्य सरकारने शिक्षणावरील खर्च सहा टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

यावेळी प्रा.डॉ.संतोष जेठीथोर, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, प्रा. डॉ.इब्राहिम मुल्लाणी, प्रा. शंकर सोडगे, प्रा.डॉ.विजया पाटील, प्रा.युगंधरा निंबाळकर आदी उपस्थित होते.