Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Kolhapur › आज होणार ‘चला नाती जपूया’ व्याख्यान

आज होणार ‘चला नाती जपूया’ व्याख्यान

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 8:37PMकोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे आज दि. 24  मे  रोजी दु. 4.00 वा. अपर्णाताई रामतीर्थकर यांचे ‘चला नाती जपूया...’  हे व्याख्यान आयोजित केले आहे. कौटुंबिक पातळीवर उद्भवणार्‍या अनेक समस्यांचे मूळ व त्यावरील उपाय अपर्णाताईंच्या प्रभावी व्याख्यानातून ऐकण्याची संधी महिलावर्गाला मिळणार आहे. कुटुंबातील संवाद व नाजूक नातेसंबंध याविषयी थोडे भावनिक तर थोडे कठोर, काही मजेशीर तर काही रोखठोक असे हे व्याख्यान आज दुपारी इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, राजारामपुरी, लकी बझारच्या वर, लकी टॉवर्स येथे होईल. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल व विशेष सहकार्य इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन.

आपली जागा आरक्षित करण्यासाठी संपर्क :

 टोमॅटो एफ एम कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर. 

फोन   नं. :  8805007724, 8805024242,  ऑफिस : 0231 6625943.