Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Kolhapur › जागेच्या वादातून पिता-पुत्रांना जाळण्याचा प्रयत्‍न 

जागेच्या वादातून पिता-पुत्रांना जाळण्याचा प्रयत्‍न 

Published On: Feb 12 2018 9:03PM | Last Updated: Feb 12 2018 9:03PMकुरुंदवाड/प्रतिनिधी 

गौरवाड (ता. शिरोळ) येथे घर जागेच्या वादातून युवकाला मारहाण करून त्याच्यासह त्‍याच्या वडिलांवर रॉकेल टाकून त्‍यांना जाळण्याचा प्रयत्‍न केल्‍याची घटना घडली आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. उमेश शामराव एैवळे(वय, 28) आणि शामराव चंद्राप्पा एैवळे (वय, 58) अशी जखमींची नावे आहेत. 

याप्रकरणी संशयित आरोपी अमोल कुंभोजे, आप्पासाहेब पाटील, बसवराज पाटील (तिघे रा.गौरवाड ता.शिरोळ) यांच्या सह परस्परा विरुद्ध कुरूंदवाड पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस फौजफाट्यासह ते घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलिस अधिक्षक दिनेश बारी, इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.

पोलिस प्रशासनाकडे रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष शाहिर आवळे, रामदास मधाळे, बंडा आवळे यांनी केली आहे.