Sat, Aug 24, 2019 23:38होमपेज › Kolhapur › लबाड लांडगं ढ्वाँग करतंय, गोकुळ वाचवायचं स्वाँग करतंय

'लबाड लांडगं ढ्वाँग करतंय'; गोकूळच्या मोर्चात आरोप

Published On: Dec 07 2017 10:17PM | Last Updated: Dec 08 2017 8:24AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘लबाड लांडगं ढ्वाँग करतंय, गोकुळ वाचवायचं स्वाँग करतंय,’ ‘आधी हॉटेल चालवून दाखवा, मग गोकुळकडे बघा,’ ‘चालवता येईना स्वत:चं हॉटेल, गोकुळ चालवताना हातभर फाटेल,’ ‘गोकुळच्या मुळावर उठलेल्या बोक्याला आवरा,’ अशा अस्सल गावरान भाषेत लिहिलेले घोषणांचे फलक आणि लांडगा आणि बोक्याच्या कटआऊट्सनी गोकुळ मोर्चातून आमदार सतेज पाटील यांना टार्गेट करण्यात आले. सत्ताधारी संचालकांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शन करत, ‘गोकुळवर डोळा असणार्‍यांचा धिक्‍कार असो,’ अशा घोषणाही दिल्या. 

आमदार सतेज पाटील यांनी दूध दरकपातीसह संचालकांच्या बेबंद खर्चाचा मुद्दा घेऊन मागील आठवड्यात मोर्चा काढल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी निषेध मोर्चा आणि जागृती मेळावा या नावाने सत्ताधार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आठवडाभरापासून मोर्चाची जिल्हाभरात तयारी सुरू होती. दसरा चौकातील मैदानावर बुधवारी संध्याकाळपासून तयारी करण्यात येत होती. गुरुवारी सकाळपासून पार्किंग व्यवस्थेसह बंदोबस्ताकरिता मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अकरा वाजल्यापासून दसरा चौकात प्रत्येक तालुक्याचे स्टिकर लावून गाड्या येऊ लागल्या. गावागावांतून लोकांना घेऊन येणार्‍या गाड्यांनी साडेअकराच्या सुमारासच दसरा चौक भरून गेला. गाड्यांच्या चित्रीकरणाची व्यवस्था ‘गोकुळ’ व्यवस्थापनाकडून बजावली जात होती. चौकात आल्यानंतर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होत होती, तर लोक उतरून, ‘मी गोकुळचा, गोकुळ माझे,’ या टोप्या घालून हातात लिहिलेले घोषणा फलक घेऊन मोर्चासाठी सज्ज होत होते.

प्रत्येक संचालक आपापल्या गटासह येऊन शक्‍तिप्रदर्शन करताना दिसत होते. साडेबाराच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक आल्यानंतर शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, बसंत-बहार रोड मार्गे मोर्चा दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

संबंधित बातम्या :
गोकुळमध्ये महाडिक कुटुंबीयांचे २४ टँकर : सतेज पाटील
सतेज पाटलांच्या पापाचा घडा भरला