Thu, Apr 25, 2019 07:47होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड : दुचाकीच्या अपघातात अपंग व्यक्‍तीचा मृत्‍यू

कुरूंदवाड : दुचाकीच्या अपघातात अपंग व्यक्‍तीचा मृत्‍यू

Published On: Mar 21 2018 6:48PM | Last Updated: Mar 21 2018 6:48PMकुरूंदवाड :  प्रतिनिधी 

मजरेवाडी ता.शिरोळ येथे चिक्कूच्या बागेजवळ  मोपेडच्या अपघात शिवाजी जयपाल कोरवी (वय 25 रा.बोरगाव ता.सदलगा) हे जागीच ठार झाले. कोरवी हे पायाने अपंग होते. ते आपल्‍या स्‍कुटीवरून जात असताना गाडीवरून त्‍यांचा ताबा सुटल्‍याने स्‍कुटीची झाडला धडक बसून झालेल्‍या अपघातात ते जागीच ठार झाले.

याविषयी अधिक माहिती अशी की, शिवाजी कोरवी हा पायाने अपंग होता. तो बोरगावहून मजरेवाडीच्या दिशेने अकिवाटकडे टीव्हीएस स्कुटी वरून जात असताना, मजरेवाडी हद्दीतील चिक्कू बागे जवळील वळणावर कोरवी याचा गाडीवरुन ताबा सुटला आणि त्‍यांची मोपेड वळणावरील नारळाच्या झाडाला  जाउन जोरात धडकली. यात कोरवी याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. दरम्यान शिरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरवी याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.