Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Kolhapur › कुरूंदवाडमध्ये 'निर्भया' कडून रोडरोमिओंना दणका

कुरूंदवाडमध्ये 'निर्भया' कडून रोडरोमिओंना दणका

Published On: Dec 09 2017 5:57PM | Last Updated: Dec 09 2017 5:57PM

बुकमार्क करा

कुरूंदवाड : वार्ताहर

येथील बसस्थानक व महाविद्यालय परिसरातील रोडरोमिओंवर इचलकरंजी, कुरुंदवाड विभागीय पोलिस महिला निर्भया पथकाने कारवाई करत मुसक्या आवळल्या. १४ रोडरोमिओना समज देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. या कारवाईतून ३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

इचलकरंजी कुरुंदवाड विभागीय पोलिस महिला निर्भया पथकाच्यावतीने आज सकाळी बारा वाजता माळभाग परिसरातील महाविद्यालय रस्त्यावर दुचाकीवरून दोनपेक्षा अधिक जण बसून जाणाऱ्या व मुलींना पाठीमागे वळून पाहणाऱ्या व चौकात थांबून राहणाऱ्या अशा ७ रोमिओंना निर्भया पथकाने ताब्यात घेत पोलिस ठाण्यात हजर केले.

बसस्थानक परिसरात परगावहून शिक्षणासाठी येणार्‍या मुलींकडे पाहत राहणाऱ्या व एसटीसमोर उभारून सेल्फी काढणाऱ्या सहा रोडरोमिओंना ताब्यात घेत कुरूंदवाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. या १४ रोडरोमिओंना निर्भया पथकाच्यावतीने समज देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. या कारवाईतून ३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

निर्भया पथकाच्यावतीने आज सकाळी अचानकपणे सुरू झालेल्या या कारवाईने रोडरोमिओंचे धाबे दणाणले होते. परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. या पथकात पोलिस उपनिरीक्षक पल्लवी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती कांबळे, आम्रपाली कांबळे, तृप्ती कांबळे आदी सहभागी होते.