Tue, Nov 20, 2018 21:06होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड घाणीच्या विळख्यात : सफाई कर्मचार्‍यांचे आंदोलन 

कुरूंदवाड घाणीच्या विळख्यात : सफाई कर्मचार्‍यांचे आंदोलन 

Published On: Feb 23 2018 10:34AM | Last Updated: Feb 23 2018 10:34AMकुरूंदवाड : प्रतिनिधी

कुरूंदवाड पालिकेच्या मक्तेदार सफाई कर्मचार्‍यांचा जानेवारी महिन्याचा पगार न दिल्याने आज सकाळपासून अचानकपणे कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने संपूर्ण शहर घाणीच्या विळख्यात सापडले आहे. ठेकेदाराच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत असून संबंधित ठेकेदाराकडून शहर स्वच्छतेचा ठेका काढून घेण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

कुरूंदवाड शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारांकडून सफाई कामगारांचे पगार न देण्यात आल्याने आज सकाळपासून अजून स्वच्छता करण्यात आलेली नाही.

दरम्यान गुरुवारचा आठवडी बाजार झालेल्या भाजीपाल्याच्या बाजाराचा कचरा संपूर्ण शहरामध्ये पसरून असल्याने  संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठेकेदारांच्या या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होऊ लागला आहे.