Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Kolhapur › अखेर कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन मिळाले 

अखेर कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन मिळाले 

Published On: May 30 2018 2:37PM | Last Updated: May 30 2018 2:37PMकुरुंदवाडः प्रतिनिधी 

कुरूंदवाड पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार देण्यात आले नसल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने आज प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी ठेकेदार सुनील सनबे यांच्याकडून मासिक अहवालाची पूर्तता करून घेत धनादेश देत कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा केला.

कुरूंदवाड शहरातील स्वच्छतेचा साताऱ्यातील पाचगणी येथील सुनील सनबे यांना ठेका देण्यात आला आहे. कामगारांच्या हजेरीचा व कामाचा मासिक अहवाल लेखापरीक्षकांकडून गेल्या दोन महिन्यांपासून सादर न केल्याने पगाराचा धनादेश काढण्यात आलेला नव्हता. यामुळे सफाई कामगार त्रस्त झाले होते.

याबाबतचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने आज प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन मासिक अहवालाची पूर्तता करून घेत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी लेखापरीक्षकांकडून सफाई कामगारांच्या पगाराचा धनादेश वितरीत केला. सफाई कामगारांना या बातमीमुळे न्याय मिळाल्याबद्दल दैनिक 'पुढारी'चे शहरात कौतुक होत आहे.