Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Kolhapur › लाटवाडीनजीक अपघातात बालक ठार; ६ जण जखमी

लाटवाडीनजीक अपघातात बालक ठार; ६ जण जखमी

Published On: Dec 03 2017 10:02PM | Last Updated: Dec 03 2017 10:02PM

बुकमार्क करा

कुरूंदवाड : वार्ताहर

डंपर व अ‍ॅपेरिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात होऊन महमदअरिस फिरोज मुल्ला (वय 4, रा. अब्दुललाट) या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी  झाले आहेत. लाटवाडी (ता. शिरोळ) येथील शिरगावे मळ्यानजीक हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजता घडला. जखमींना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

हसन नबीसो हारुगिरे (वय 58), राबिया हसन हारुगिरे (50), फारुख हसन हारुगिरे (28), हुजेफ हसन हारुगिरे (25, रा. अब्दुललाट) आणि कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतमधील  सौ. आसमा फिरोज मुल्ला (30), आशिया फिरोज मुल्ला (7) अशी जखमींची नावे आहेत.

वरील सर्व जण सदलगा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी अ‍ॅपेरिक्षातून(एम एच 09 ए सी 9587) जात होते. लाटवाडीनजीक शिरगावे मळ्यानजीक अब्दुललाटकडे जाणार्‍या डंपरशी (एम एच 09  बी सी 4363) रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षातील महमदअरिस  मुल्ला हे बालक जागीच ठार, तर इतर सहा जण जखमी झाले.

अपघातानंतर आक्रोश आणि किंकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढून कोल्हापूरला पाठविले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आ. उल्हास पाटील, जि. प. सदस्य विजय भोजे घटनास्थळी भेट दिली. अपघाताची फिर्याद इरफान मन्सूर हारुगिरी (रा. अब्दुललाट) यांनी कुरूंदवाड पोलिसात दिली आहे.

मुल्ला कुटुंबावर दु:खाचा डोंगर

आसमा मुल्ला यांच्या पतीची वर्षभरापूर्वी बायपास सर्जरी शस्त्रक्रिया झाली असून त्यांची घरची परिस्थितीही बेताची आहे. त्या माहेरी अब्दुललाट येथे आल्या होत्या. त्यांचा चार वर्षांचा मुलगा महमदअरिस या अपघातात ठार झाला, तर आशिया मुल्ला जखमी आहे. या आघाताने मुल्ला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.