Fri, Dec 14, 2018 00:04होमपेज › Kolhapur › कुंभार समाजाचे दुष्टचक्र थांबणार कधी?

कुंभार समाजाचे दुष्टचक्र थांबणार कधी?

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:45AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

आपल्या परंपरागत कलेच्या आधारे फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन कलाविष्कार घडविणार्‍या राज्यातील कुंभार समाजाचे दुष्टचक्र काही थांबत नाही, अशी अवस्था आहे. राज्य शासनापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत या समाजाला दिलासा देण्यासाठी विशिष्ट मर्यादेपर्यंत माती उत्खननाच्या रॉयल्टीमधून सवलत दिली. परंतु, स्थानिक पातळीवर शासकीय अधिकारी उत्खननाच्या दंडाच्या नोटिसा बजावून या समाजाला बेजार करते आहे. त्यातही पारंपरिक गणेश मूर्ती व्यवसायात एकीकडे शाडू उत्खननाला बंदी आणि दुसरीकडे प्लास्टर वापराला बंदी अशा धोरणांमुळे या समाजाचे संसार रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

या व्यथा मांडण्यासाठी राज्यातील कुंभार समाजातर्फे आज (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. यापूर्वीही त्यांनी आंदोलने केली, निवेदने दिली; पण आश्‍वासनांखेरीज काहीच हाती लागत नसल्याने निर्वाणीचा इशारा म्हणून या समाजाने हे पाऊल उचलले आहे, त्यावर योग्य निर्णय व्हावा अशी अपेक्षा समाजातून व्यक्‍त केली जात आहे.