होमपेज › Kolhapur › सहा ग्रा.पं.साठी उद्यापासून धूमशान

सहा ग्रा.पं.साठी उद्यापासून धूमशान

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:09AM

बुकमार्क करा

कुडित्रे ः प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील केकतवाडी, वाशी, शिरोली दुमाला, चिंचवाड, निटवडे आणि सांगवडेवाडी या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धूमशान मंगळवार (दि. 5) पासून सुरू होत असून दि. 26 डिसेंबरला मतदान होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम: उमेदवारी अर्ज दाखल करणे - 5 ते 11 डिसेंबर, सकाळी 11 ते 4.30, छाननी - 12 डिसेंबर सकाळी 11 वाजल्यापासून, माघार - अंतिम दिनांक 14 डिसेंबर दुपारी 3 पर्यंत, चिन्ह वाटप - 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 नंतर, मतदान - 26 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायं. 5.30, मतमोजणी - 27 डिसेंबर ठिकाण व वेळ - तहसीलदार निश्‍चित करतील. निकाल प्रसिद्धी - 28 व 30 डिसेंबर. सरपंच आरक्षणे - वाशी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगवडेवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, केकतवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरोली दुमाला - अ. जा. महिला, चिंचवाड - नागरिकांचा मागास प्रवर्ग, निटवडे - खुला प्रवर्ग. यापैकी वाशी, केकतवाडी, निटवडे आणि शिरोली दुमाला या ग्रामपंचायती करवीर विधानसभा मतदारसंघात तर चिंचवाड व सांगवाडेवाडी या ग्रामपंचायती कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आहेत.