Sun, Sep 22, 2019 22:02होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात ठरल्याप्रमाणे मंडलिक खासदार

कोल्हापुरात ठरल्याप्रमाणे मंडलिक खासदार

Published On: May 23 2019 8:01AM | Last Updated: May 23 2019 5:18PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तळ ठोकूनही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाडिकांना अस्मान दाखवत संसदेत प्रवेश केला आहे. विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. 

मंडलिक यांच्या विजयात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षातील सुंदोपसुंदी, काँग्रेसने केलेला उघड विरोध, अंतर्गत वाद अशी अनेक कारणे महाडिकांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.   

►बंटींची 'आमच ठरलं' भूमिका फायद्याची ठरली : संजय मंडलिक

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत २३ एप्रिलला अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. कोल्हापुरात ७०.७० टक्के मतदान झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीची तयारीच केली होती.    

कोल्हापुरातून १३ तर हातकणंगले मतदार संघातून १५ उमेदवार रिंगणात होते.

►बंटींची 'आमच ठरलं' भूमिका फायद्याची ठरली : संजय मंडलिक

LIVE : 

243746 आघाडी मंडलिक 16 वी फेरी

सदाभाऊ खोत धैर्यशील मानेच्या विजयी मिरवणूकीत

233196 आघाडी मंडलिक 15 वी फेरी

216422 मंडलिक आघाडीवर

कोल्हापूर: रमणमळा मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती व गोकुळचे संचालक अमरीश घाडगे व पोलीस पथकात जोरदार वादावादी आणि धक्काबुक्की झाल्याची घटना घडली 

158537 दहवी फेरी मंडलिक आघाडी

प्रा.संजय मंडलिक लीड  
1..चंदगड     15, 510   (6 वी)
2. राधानगरी 15, 515   ( 8 वी) 
3. कागल      33,469     ( 7 वी) 
4. दक्षिण      12, 618   ( 5 वी) 
5.करवीर      21, 799    ( 6 वी) 
6. उत्तर           5261   ( 4 वी)

 एकूण 1 लाख 4 हजार 710

सहावी फेरी पुर्ण मंडलिक एक लाख 4992 आघाडी

8  वी फेरीत 76 हजार आघाडी मंडलिक

60399  पाचव्या फेरिअखेर मंडलिक आघाडी

५४ हजार मतांनी मंडलिक आघाडीवर

कोल्हापुरात मंडलिक १५ हजार मतांनी आघाडीवर 

काेल्हापुरात संजय मंडलिक आघाडीवर