Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Kolhapur › धोका वाटल्यानेच जि.प.चा अध्यक्ष न बदलण्याचा निर्णय

धोका वाटल्यानेच जि.प.चा अध्यक्ष न बदलण्याचा निर्णय

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील मोठी व्यक्ती आहे. ती आपणास कशाला घाबरेल. जिल्हा परिषद अध्यक्ष बदलण्यात त्यांना धोका वाटत असेल म्हणून कदाचित त्यांनी अध्यक्ष न बदलण्याचा निर्णय घेतला असावा, असे आमदार हसन मुश्रीफ यांन सांगितले. ‘मान या ना मान, तू मेरा मेहमान’ अशा शब्दात त्यांनी भाजप -शिवसेनेच्या युतीबाबत पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडविली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, गेल्या चार वर्षांत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा संंधी मिळेल त्याठिकाणी अपमान केला आहे. जेवढा अपमान करायचा होता तेवढा करून घेतला आहे. असे असताना पालकमंत्री भाजप-सेनेची युती झाल्यास काँग्रेस राहणार नाही, असे वक्तव्य करत असतील तर ‘मान या ना मान, तू मेरा मेहमान’ असेच त्यांना म्हणावे लागेल. सध्या गाजत असलेल्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलण्याचा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. आपण काय बोलणार. पालकमंत्र्यांनी आपणास घाबरावे, एवढे आपण मोठे नाही. अध्यक्षपदाच्या बदलात कदाचित त्यांना धोका वाटला असावा म्हणून त्यांनी अध्यक्ष बदलाचा निर्णय बदलला असेल. 

प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून ही अवघ्या काही दिवसांत कोल्हापूरची विमानसेवा बंद पडल्यामुळे कोल्हापूरचा अपमान झाला आहे. कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याबाबत दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून ते आताचे आमदार सतेज पाटील यांनीदेखील प्रयत्न केले आहे. तेव्हादेखील काही दिवस विमानसेवा सुरू झाली आणि परत बंद पडली. त्यावेळी देखील आताचीच एअर डेक्कन कंपनी होती. 
कंपनीने कर्मचार्‍यांचे पगारच दिले नाही. त्यामुळे असेच होणार? इंडिगो किंवा जेट स्पाईस या कंपन्या चांगल्या आहेत. त्यांची विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील तीनही खासदारांनी प्रयत्न करावेत. केंद्रातील संबंंंधित खात्याचे मंत्रीही महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेऊन पुन्हा ही नवीन विमानसेवा सुरू करून कोल्हापूरच्या जनतेचा झालेला अपमान पुसून टाकावा. त्याला आमचे संपूर्ण सहकार्य राहील, असेही आमदार मुश्रीफ म्हणाले.