Tue, Jul 16, 2019 02:06होमपेज › Kolhapur › जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मित्तल

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मित्तल

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अमन मित्तल यांची नियुक्‍ती झाली आहे. दि. 16 ऑगस्ट रोजी ते कायर्र्भार स्वीकारणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ते सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची चंद्रपूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्‍त होते. या रिक्‍त पदावर अमन मित्तल यांची नियुक्‍ती करण्यात आली.

26 वर्षीय मित्तल हे मूळचे दिल्‍लीचे आहेत. 2015 साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते पहिल्याच प्रयत्नात विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचे दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्‍लीतच इंग्रजी माध्यमातून झाले आहे. दहावीला 92.6, तर बारावीला 90 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी आयआयटी दिल्‍लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात एम.टेक. केले आहे. मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाची निवड केली होती. बुद्धिबळ आणि ध्यानसाधना याची त्यांना आवड आहे. कोल्हापुरात नियुक्‍ती होण्यापूर्वी ते नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक विकास प्रकल्प, कळवण येथे कार्यरत होते.