Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Kolhapur › दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 8:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

नाताळची सुट्टी सुरू होते ना होते, तोच कोल्हापूर शहर भाविक पर्यटकांनी अक्षरश: हाऊसफुल्ल झाले आहे. शनिवारी, रविवारी अशा दोन दिवसांत तब्बल दोन लाखांहून जास्त भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. 

दोन दिवसांपासून शहरातील सर्व हॉटेल्स, धर्मशाळा पर्यटकांनी भरल्या आहेत. यात्री निवासही पॅक झाले आहेत. शहरात अनेक यात्री निवास व हॉटेल्सना पार्किंगची सुविधा नसल्याने रस्तोरस्ती पर्यटकांच्या गाड्या लागल्या आहेत. परिणामी, शहरात वाहतूक कोंडीही जाणवू लागली आहे.  

महापालिका प्रशासनाने विद्यापीठ पार्किगसमोर महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय केली आहे; पण स्वच्छतेअभावी यापैकी अनेक बंद आहेत. याच आवारात असलेले पाण्याचे एटीएम बंदच आहे. मंदिर आवारात भाविकांना निवांत दोन क्षण बसण्याचीही सुविधा नाही. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत कोल्हापुरात कमी सुविधा मिळत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.