Thu, Jul 18, 2019 05:52होमपेज › Kolhapur › ‘ऊब आपुलकीची’साठी थँक यू कोल्हापूरकर!

‘ऊब आपुलकीची’साठी थँक यू कोल्हापूरकर!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर हे नेहमीच संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करून ती सातत्याने जपण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. याच भावनेतून बोचर्‍या थंडीत गरजवंतांना ‘आपुलकीची ऊब’ देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 94.3 टोमॅटो एफ. एम. रेडिओ स्टेशनच्या ‘ऊब आपुलकीची’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. याबद्दल कोल्हापूरकरांचे टोमॅटो एफ.एम.तर्फे धन्यवाद!

आपण माणुसकी जपण्यासाठी जगात भारी म्हणून ओळखले जाताच; पण ‘ऊब आपुलकीची’ या उपक्रमासाठी कोल्हापूरकरांनी ब्लँकेट्स, शॉल, रग टोमॅटो एफ.एम.च्या कार्यालयाकडे पोहोचवून सामाजिक बांधीलकी जपली. या उपक्रमामध्ये शहरासह ग्रामीण भागातूनही ऊबदार कपडे जमा झाले आहेत. थंडीपासून संरक्षण करणार्‍या या वस्तू टोमॅटो एफ. एम.च्या वतीने  दि. 1 डिसेंबरपासून गरजवंतांना वाटप करण्यात येणार आहेत. अगदी लहानांपासून वयस्कर लोकांंपर्यंत ही ‘आपुलकीची ऊब’ पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आमच्या या प्रयत्नात आपला वाटा मोलाचा आहे. ही संवेदनशीलता अखंडित ठेवण्याचे ध्येय आपल्या माध्यमातून साध्य करत राहू. कोल्हापूरकरांच्या या योगदानासाठी मनापासून धन्यवाद!

सौ. स्मिता योगेश जाधव
मॅनेजिंग डायरेक्टर,
94.3 टोमॅटो एफ. एम., कोल्हापूर