Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Kolhapur › राज्यात साखर उतार्‍यात कोल्हापूरच लईभारी!

राज्यात साखर उतार्‍यात कोल्हापूरच लईभारी!

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:47PMराशिवडे : प्रवीण ढोणे

राज्यातील 98 सहकारी व 84 खासगी कारखान्यांनी प्रतिदिन 657580 मे.टन क्षमतेने गाळप करून 478.68 लाख मे.टन ऊस गाळपचा टप्पा ओलांडला असून यामध्ये उतार्‍यामध्ये कोल्हापूर विभागच लईभारी ठरला आहे, तर गाळपामध्ये पुणे विभाग नंबर वन ठरला आहे.राज्यातील सरासरी साखर उतार्‍यामध्ये. 53 टक्क्याने वाढ झाली आहे.

राज्यामध्ये खासगी 84 तर सहकारी 98 अशा 182 साखर कारखान्यांनी गतहंगामाच्या तुलनेत आजअखेर दुपटीने गाळप केले आहे. गतवर्षी  खासगी व सहकारी अशा 149 कारखान्यांनी जानेवारीच्या दुसर्‍या आठवडाअखेर प्रतिदिन 503400 मे. टन क्षमतेने 290.44 लाख मे.टन उसाचे गाळप केले होते. या हंगामामध्ये मात्र यामध्ये 33 साखर कारखान्यांची नव्याने भर पडली आहे. या कारखान्यांनी प्रतिदिन 657580 मे. टन क्षमतेने 478.68 लाख मे.टन उसाचे गाळप करून 503.34 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आजअखेर राज्याचा सरासरी साखर उतारा10.52 इतका असून मागील हंगामात 10.79 इतका होता. साखर उतार्‍यामध्ये कोल्हापूर विभाग लईभारीच ठरला आहे. कोल्हापूरचा साखर उतारा 11.78 इतका असून औरंगाबादचा साखर उतारा 8.90 इतका नीचांकी राहिला आहे. गाळपामध्ये पुणे विभागाने बाजी मारली आहे.