Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः श्वास गुदमरुन सहा कामगार अत्यवस्थ

कोल्हापूरः श्वास गुदमरुन सहा कामगार अत्यवस्थ

Published On: Dec 26 2017 7:55PM | Last Updated: Dec 26 2017 7:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूरः प्रतिनिधी

दूधाळी येथील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील ३० फूट खोल असलेल्या जॅकवेलमध्ये रंगकाम करताना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने, श्वास गुदमरुन सहा कामगार बेशुध्द होऊन अत्यवस्थ झाले. त्यांना तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

सुनाराम हसदा (वय २४), सायबा हसदा (२२), भूपाल हसदा (२७), गरलाई हेबरम (३०), रुपाए मुरमू (२५), उदयराम मंड्डी (२४, सर्व रा. झारखंड) अशी त्यांची नावे आहेत.