Wed, Jul 17, 2019 08:28होमपेज › Kolhapur › कोल्हापूर: भीषण अपघातातील मृतांची नावे

कोल्हापूर: भीषण अपघातातील मृतांची नावे

Published On: Jan 27 2018 9:23AM | Last Updated: Jan 27 2018 9:39AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

प्रजासत्ताक दिनाच्या रात्री कोल्हापूरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलाजवळ भीषण अपघात झाला होता. प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्यांमुळे बरेच लोक सहपरिवार सहलीसाठी कोल्हापूर आणि जवळासच्या भागात आली होती. असेच पुण्यातील केदारी कुटुंब सुट्टीसाठी गणपतीपुळे येथे गेले होते. काल रात्री केदारी कुटुंब गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन कोल्हापूरकडे येत होते. त्यावेळी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला. केदारी कुटुंब ज्या मिनीबसमधून येत होते ती मिनीबस शिवाजी पूलाचा कटडा तोडून पंचगंगेत कोसळली.  

वाचा- कोल्हापूर : भीषण अपघात; स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य (video)

हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

या  अपघातातील व्‍यक्‍ती : मनीषा संतोष वरखडे (वय ३८), संतोष बबनराव वरखडे (४५), गौरी संतोष वरखडे (१५), ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१४), सचिन भरत केदारी (३४), निलम सचिन केदारी (२८), संस्‍कृती सचिन केदारी (८), सानिया सचिन केदारी (९ महिने), भावना दिलीप केदारी (३) साहिल दिलीप केदारी (१४), श्रावणी दिलीप केदारी (११), छाया दिनेश नागरे (४१), प्राजक्‍ता दिनेश नागरे (१८), मंदा भरत केदारी (५०), प्रतीक दिनेश नागरे (१४)

वाचा- कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

वाचा- पंचगंगा नदीवरील भीषण अपघाताचे Exclusive फोटो