Sat, Jan 19, 2019 03:26होमपेज › Kolhapur › 'पर्यायी शिवाजी पुलाचे काम लवकरच सुरू'

'पर्यायी शिवाजी पुलाचे काम लवकरच सुरू'

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 12:06AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पर्यायी शिवाजी पुलाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूरसाठी विशेष म्हणून या विधेयकात दुरुस्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय सांस्कृतिक व पुरातत्त्व खात्याचे मंत्री महेश शर्मा यांनी प्रयत्न केले आणि दिलेले आश्‍वासन पूर्ण केले, असे ना. पाटील यांनी म्हटले आहे. 

ते म्हणाले, तीन वर्षांपासून पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पुरातत्त्व खात्याच्या आक्षेपामुळे रखडले आहे. प्राचीन स्मारक-पुरातत्त्व स्थळ व अवशेष संशोधन विधेयकाच्या तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. पर्यायी पुलाचे काम रखडल्याने कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले. त्याची दखल घेत दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि ना. महेश शर्मा यांच्याकडे पाठपुरावा केला. 

या पाठपुराव्यामुळेच आज लोकसभेत हे दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. या दुरुस्तीमुळे केवळ कोल्हापुरातील नव्हे, तर सगळ्या देशातील पर्यायी पुलांचे व अन्य विकासकामे झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.