Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः शिरोलीत गॅस गळतीमुळे स्फोट; 9 जखमी

कोल्हापूरः शिरोलीत गॅस गळतीमुळे स्फोट; 9 जखमी

Published On: May 30 2018 11:35AM | Last Updated: May 30 2018 11:57AMकोल्हापूरः प्रतिनिधी

पुलाची शिरोलीत घरगुती गॅसचा भडका उडून फ्रिजचा स्फोट झाल्याने 9 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमीतील काहींना सीपीआर रूग्णालयात तर काहींना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुधाराणी काडगोंड ह्या घरात चहा बनवत असताना अचानक गॅस लिकेज होऊन त्याचा भडका उडाला. तेव्हा त्या ओरडत घराबाहेर धावत आल्या. तेव्हा बाजूला घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारा घर मालकाचा मुलगा खाली धावत आला.

तो व इतर लोक आग विजवण्यासाठी गॅस टाकीवर वाळू व माती टाकत होते. तेव्हा अचानक स्वयंपाक घरातील फ्रीजचा स्फोट झाला. यामध्ये 2 वर्षाच्या लहान बाळासह 9 जण जखमी झाले. काही जखमींना तात्काळ सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले. तर दोघाना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.   घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे हे सीपीआर येथे येऊन घटनेची माहिती घेतली.

या स्फोटात घरातील महेंद्र कृष्णा पाटील (वय 22) कृष्णा केदारी पाटील (वय ५२, घर मालक ) मारुती शिवाजी सुतार (वय ३८) दिनकर शंकर जाधव (वय ५०), सुधाराणी दराप्पा काडगोंड (वय 22) श्रावणी दराप्पा काडगोंड (वय 2  ) निल्लवा हणमंत काडगोंड ( ४८),  निलेश सहदेव अडाव्ह (२८) सर्व रा. माळवाडी) हे सर्व जखमी झाले आहेत.