Tue, Nov 20, 2018 19:20होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : शिरढोण येथे दुधाने अंघोळ करत आंदोलन (video)

कोल्‍हापूर : शिरढोण येथे दुधाने अंघोळ करत आंदोलन (video)

Published On: Jul 17 2018 2:51PM | Last Updated: Jul 17 2018 2:51PM
कुरुंदवाड  : प्रतिनिधी

शिरढोण ता.शिरोळ येथे  शेतकर्‍याच्या दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे,  यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालय चौकात दूध संकलन करून दुधाने अंघोळ करत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला.

शिरढोण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातून शासनाचा निषेध रॅली काढून दूध संकलन केले.    तसेच ग्रामपंचायत चौकात शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत विश्वास बालीघाटे,  राजू चौगुले, दादासाहेब चौगुले, बाहुबली मालगावे, कल्लापा चौगुले, यशवंत चंदुरे, सुभाष चौगुले आणि सुरेश समगे अदिनी दुधाने अंघोळ करून शासनाचा निषेध नोंदवत ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते.