Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Kolhapur › शेंडापार्क परिसरात अंधश्रद्धेचे पेव

शेंडापार्क परिसरात अंधश्रद्धेचे पेव

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:43PM

बुकमार्क करा
कंदलगाव : वार्ताहर

अधोरी विद्येचा प्रयोग करण्यासाठी शेंडापार्क परिसरातील वृक्षांचा वापर होत आहे. परिसरातील अनेक वृक्षांच्या बुंध्याला, फांदीला उलट्या बाहुल्या खिळ्याने मारल्याने पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्‍त होत आहे. 

शेंडापार्क परिसरातील अगदी मुख्य रस्त्याशेजारी असणार्‍या वृक्षाच्या बुंध्यावर या विद्या लटकत असून बुंध्यात मारलेल्या मोठ्या खिळ्यांमुळे मात्र त्या वृक्षांचा जीवच टांगत आहे. या विद्येचा वापर करताना एखाद्याच्या नावाने चिठ्ठी तयार करून  त्या चिठ्ठीत खिळा मारून ठेवणे, तीन धारी लिंबू घेऊन त्यामध्ये मोठ्या सुई आरपार करून लिंबू फांदीला अडकणे, काळी बाहुली उलटी करून खिळा मारणे, पांढर्‍या कापडावर रेषा मारून हळद-कुंकू लावून कापडाच्या चार कोपर्‍यावर खिळे मारणे, मंत्र लिहिलेला मजकूर काळ्या दोर्‍याने बांधून लटकत ठेवणे, तारेच्या सहाय्याने फांदी घट्ठ बांधणे यासारख्या अनके विद्येचा वापर होत असल्याने ज्या वृक्षांवर हा प्रयोग केला आहे. यामुळे झाडांच्या फांद्या निकामी होत असल्याचे चित्र आहे. शेंडा पार्क परिसरात अशा अघोरी विद्येचे प्रमाण वाढत असून संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वृक्ष वाचवावे, असे निसर्गप्रेमींतून बोलण्यात येत आहे. 

अंधश्रद्धेच्या माध्यमातून असे प्रकार घडत असून झाडामध्ये मारलेल्या खिळ्यांमुळे झाडाच्या खोडातील पेशी मृत पावतात. हा खिळा खोडामध्ये अनेक दिवस राहिल्याने उभे झाडे वाळू शकतात. नागरिकांनी आशा अंधश्रद्धेपोटी झाडांना वेठीस धरू नये. मी स्वतः याबाबत महापालिकेस कळवून असे खिळे, तारा काढून घेण्यास सूचना दिल्या आहेत.
-प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर
वनस्पती तज्ज्ञ