Sun, May 19, 2019 22:10होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील शाळा 3 दिवस अघोषित बंद राहणार

जिल्ह्यातील शाळा 3 दिवस अघोषित बंद राहणार

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 1:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक संपात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती व राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या सुमारे 3 हजार 800 हून अधिक शाळा तीन दिवस अघोषित बंद राहणार आहेत.

सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी तीन दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. रविवारी मुख्याध्यापक संघात जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक झाली. लाक्षणिक संपात जिल्ह्यातील 12 हजार माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 830 हून अधिक माध्यमिक शाळा अघोषित बंद राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक कोल्हापुरात झाली. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी 75 हजार प्राथमिक शाळांमधील सुमारे चार लाख शिक्षक संपात सहभागी होणार आहेत. संपात जिल्ह्यातील सुमारे तीन हजार प्राथमिक शाळांमधील 14 हजारहून शिक्षक सहभागी होणार असल्याने शाळा अघोषित बंद राहणार आहेत.