Sun, Jul 21, 2019 17:03
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › राजोपाध्येनगरात बंद बंगला फोडला

राजोपाध्येनगरात बंद बंगला फोडला

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:22AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

राजोपाध्येनगरातील बंद बंगला फोडून चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत शिल्पा विजय शेतवाळ (वय 55, रा. प्लॉट 201, राजोपाध्येनगर) यांनी राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. शहरातील घरफोड्यांच्या सत्रात वाढच होत चालल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. 

राजोपाध्येनगरात शिल्पा शेतवाळ यांचा स्वानंद बंगला आहे. त्या बँकेत नोकरीस असून सुट्टीमुळे शनिवारी सकाळी बारामती नातेवाईकांकडे गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या घरी परतल्या. घराचा दरवाजा उघडून आत गेल्या असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. अन्य रूममधील लोखंडी कपाट, लाकडी कपाटांचे लॉकही उचकल्याचे दिसले. 3 तोळ्यांचे गंठण, 13 ग्रॅमचे वळे, 6 ग्रॅमचे टॉप्स, सोन्याचे पाणी दिलेला कोल्हापुरी साज, गंठण, लक्ष्मीहार, तोडे यासह 70 गॅ्रमचा चांदीचा ऐवज, एटीएम कार्ड, बँकेचे पासबुकही लंपास केले आहे.  चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केल्याचे उघड झाले. त्यांनी याची माहिती राजवाडा पोलिसांना दिली. ठसेतज्ज्ञ, श्‍वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. श्‍वान याच परिसरात घुटमळले.