Tue, Apr 23, 2019 10:01होमपेज › Kolhapur › का ठरतोय कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग अपघातांचे आगार?

का ठरतोय कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग अपघातांचे आगार? 

Published On: Jan 27 2018 10:11AM | Last Updated: Jan 27 2018 10:45AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर येथे काल जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटकांची गर्दी होती. बरेच लोक कोल्हापूर आणि कोकण अशा सहलींचे  आयोजन करुन येतात. गेल्या कही वर्षात कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांची सख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कोकणात जायचे असेल तर बरेच पर्यटक कोल्हापूर मुक्कामी येतात आणि तेथून पुढे कोकणात जातात. त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामर्गावर गर्दी वाढली आहे. 

वाचा: कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

कोकण आणि कोल्हापूरच्या दृष्टीने पर्यटन वाढणे ही जरी चांगली बाब आहे. पण, या वाढलेल्या पर्यटनामुळे कोकणात जाणाऱ्या महामार्गावरील वाहनांची संख्या देखील वाढली असल्याने त्या तुलनेत हा महामार्ग अपुरा पडत आहे. तसेच या महामार्गावर दुहेरी वाहतूक सुरु असते त्यामुळे या महार्गावरील अपघातांचे प्रमाणही तुलनेने जास्त आहे. 

वाचा: कोल्हापूर : भीषण अपघात; स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य (video)

याच महामार्गावर काल दोन भीषण अपघात झाले. एक गणपतीपूळ्याकेडे जाताना आणि एक गणपती पूळ्याकडून येताना. पहिल्या अपघातात भरधाव वेगात येणारी गाडी झाडावर आदळली. या अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला. तर रात्री कोल्हापूरातील शिवाजी पूलाचा कटडा तोडून मिनीबस पंचगंगेत पडली. या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये अरूंद रस्त्यांचा अंदाज न आल्याने अपघात झाला. याचबरोबर या महामार्गावर झालेल्या अपघातात झाडावर गाडी आदळून, पलटी होवून, ओढ्यात पडून अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातात अरुंद रस्ता आणि पूल हाच कळीचा मुद्दा आहे.

शिवाजी पूल हा १०० वर्षापेक्षाही जुना पूल आहे. त्यानंतर त्याला पर्यायी पूल अजुनही तयार झालेला नाही. याचे काम पुरात्व खात्याची परवानगी तीन वर्षे झाली तरी अद्याप न मिळाल्यामुळे रखडले आहे. जर नवीन पूल वेळेत तयार झाला असता तर हा अपघात टळला असता अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. या भीषण अपघातानंतर तरी आता प्रशासनाला जाग येणार आहे का?

वाचा : पंचगंगा नदीवरील भीषण अपघाताचे Exclusive फोटो 

या दोन भीषण अपघातानंतर आता तरी लोकप्रतिनिधींनी महामार्ग आणि पूल  रूंदीकरणाच्या कामांना अग्रक्रम देणे गरजेचे आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर झालेले मोठे अपघात

२५ जानेवारी २०१८ : रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावर अपघात, ३ ठार

९ ऑक्टोबर २०१७ : रत्नागिरी महामार्गावर अपघातात एक ठार

८ फेब्रुवारी २०१७ :  रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर अपघात; ७ ठार

२६ जुन २०१७ : ट्रकच्या धडकेत बसचालक ठार 

५ जुन २०१६ : झाडावर गाडी आदळून एकाच कुटुंबातील ५ ठार 

१७ जुन २०१३ : ओढ्यात एसयुव्ही पडून ३ ठार 

५ जुन २०१३ : वर्‍हाडाचा ट्रक उलटून पाच ठार, २५ जखमी