Mon, Aug 19, 2019 17:32



होमपेज › Kolhapur › कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाने घेतलेत ५० च्यावर बळी 

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाने घेतलेत ५० च्यावर बळी 

Published On: Jan 27 2018 11:38AM | Last Updated: Jan 27 2018 11:38AM



कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्‍हापूर-रत्‍नागिरी राज्यमार्ग पर्यटनासाठी महत्‍वाचा असल्याने बारा महिने चोवीस तास वाहतूकीच्या गर्दीत असतो. वाहतूकीच्या गर्दीमुळे या मार्गावर कुठे ना कुठे रोज अपघात होत असतात. यामध्ये आजपर्यंत अनेक जणांचा जीव गेला आहे. शुक्रवारी मिनी बसच्या झालेल्या अपघाताने हा अपघाताग्रस्‍त मार्ग पुन्‍हा एकदा चर्चेत आला. 

दरवर्षी अनेक जणांचा जीव जात असला तरी सरकारकडून मात्र अश्वासनांशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. बस, कार, मिनी बस यांची वाहतूक रोज मोठ्या प्रमाणात होते. रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील अनेक पर्यटनस्‍थळांना याच मार्गावरून प्रवासी प्रवास करतात. महाराष्ट्रातील अनेक भागातून येणार्‍या पर्यटकांसाठी हा मार्ग सोयीचा असल्याने रत्‍नागिरी जिल्‍ह्याचे पर्यटन करून हेच प्रवासी मग गोव्याकडे वळतात. सुट्टीच्या कालावधीत व पावसाळ्याच्या दिवसात येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. धोकादायक वळणावर कुठेही धोक्‍याच्या सूचना नाहीत, रिप्‍लेकटर मोक्‍याच्या ठिकाणी कुठेही बसवण्यात आलेले नाहीत. हिवाळ्याच्या दिवसात ही येथे अपघातांचे प्रमाण मोठे आहे. कोल्हापूरातील काल झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १३ लोकांचे बळी गेले. कालच कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर झालेल्या अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे  कोल्हापूर रत्नागिरी अरूंद महामार्ग आणि  या मार्गावरील अरूंद पूलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर २०१३ पासून जवळपास ५०च्या वर लोकांचा मृत्यू झाला आहे. 

या महामार्गावर झालेल्या अपघातात झाडावर गाडी आदळून, पलटी होवून, ओढ्यात पडून अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातात अरुंद रस्ता आणि पूल हाच कळीचा मुद्दा आहे.

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर झालेले मोठे अपघात

२६ जानेवारी २०१८ : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर गाडी झाडावर आदळून ८ ठार 

२६ जानेवारी २०१८ : शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

२५ जानेवारी २०१८ : रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावर अपघात, ३ ठार

९ ऑक्टोबर २०१७ : रत्नागिरी महामार्गावर अपघातात एक ठार

८ फेब्रुवारी २०१७ :  रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर अपघात; ७ ठार

२६ जुन २०१७ : ट्रकच्या धडकेत बसचालक ठार 

५ जुन २०१६ : झाडावर गाडी आदळून एकाच कुटुंबातील ५ ठार 

१७ जुन २०१३ : ओढ्यात एसयुव्ही पडून ३ ठार 

५ जुन २०१३ : वर्‍हाडाचा ट्रक उलटून पाच ठार, २५ जखमी