Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात रामनवमी भक्‍तीभावाने साजरी 

कोल्‍हापुरात रामनवमी भक्‍तीभावाने साजरी 

Published On: Mar 25 2018 4:17PM | Last Updated: Mar 25 2018 4:20PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

आज रामनवमी निमित्‍त कोल्‍हापुरातील अंबाबाई  मंदिरातील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामंदिरात रामजन्म सोहळा मोठ्‍या उत्‍साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

आज राम नवमी निमित्‍त कोल्‍हापुरातील अनेक मंदिरात राम जन्म सोहळ्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात पाळणा बांधुन त्‍याला फुलांची आरास करण्यात आली होती. दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा असल्‍याने शहरातील अनेक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अंबाबाई मंदिरातील राम मंदिरातही राम नवमीनिमित्‍त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवार पहाटे ५:३० वाजता भगवान श्री रामाला अभिषेक करण्यात आला. यानंतर श्री राम ,लक्ष्मण,सीता आणि हणुमंताची फुलांची आरास केलेली विशेष आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा सुरेंद्र झुरळे ,सुहास झुरळे यांनी बांधली . सकाळी ११ वाजता भागवतांचे रामजन्मावर आधारित प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्‍तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्‍यान आज रविवार असल्‍याने परगावच्या भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती यामुळे भर उन्हातही मंदिरात भाविाकांनी दर्शनासाठी रांगा लावल्‍या होत्‍या.

दरम्‍यान सायकांळी ९ :३० वाजता भगवान श्री राम,सीता,लक्ष्मण आणि हनुमान यांना रथात विराजमान करून त्‍यांच्या नगर प्रदक्षेनेचे आयोजन करण्यात आले आहे. ही नगर प्रदक्षीणा शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात असून पुन्हा मंदिरात आल्‍यावर या नगर प्रदक्षिणेचा समारोप होणार आहे.

Tags :kolhapur, ramnavmi, ambabai temple, mahalakshmi temple, ram temple, celebrate, ram janmakal,