Mon, Feb 18, 2019 20:31होमपेज › Kolhapur › खुनीहल्लाप्रकरणी 6 जणांना अटक

खुनीहल्लाप्रकरणी 6 जणांना अटक

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजारामपुरी येथील सग्राम विश्‍वनाथ पावसकर (वय 31, रा. 13 वी गल्ली) यांच्यावरील खुनीहल्ला प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सहा जणांना शुक्रवारी अटक केली. दारू देण्यास नकार दिल्याने संशयितानी चिडून जाऊन हल्ला केला होता. मंगळवारी (दि.12) ही घटना घडली होती.

सागर तानाजी चव्हाण (25, रा. माळी कॉलनी), सादिक माणिक सय्यद (23, टाकाळा),अवधूत दीपक वारे (19, टाकाळा), करण गजानन भांडवले (21, माळी कॉलनी, टाकाळा), अभिषेक बाळासाहेब कांबळे (22, टाकाळा) नीलेश संजय देशमुख (21, चौथी गल्ली, राजारामपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना उद्या (शनिवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. सागर चव्हाणसह साथीदाराविरुद्ध लवकरच तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठाकडे दाखल करण्यात येणार आहे.