Tue, Sep 25, 2018 16:30होमपेज › Kolhapur › शहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी

शहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 1:12AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘ओखी’ने शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात ‘अवकाळी’ दर्शन दिले. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर नसला तरी त्याचा जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. दुपारपर्यंत वातावरण कोरडे होते. मात्र, त्यानंतर अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी शहरातील अनेक भागात पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती, तर काही ठिकाणी अल्प काळ जोर होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या पावसाने ऊस तोडणीसह गुर्‍हाळावरही परिणाम झाला. रस्ते ओलसर झाल्याने दुचाकी घसरण्याचेही काही प्रकार घडले. मंगळवारीही वातावरण असेच राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्‍त केली आहे.