Wed, Jul 24, 2019 06:36होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त पोलिसांची मॅरेथॉन रन

राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त पोलिसांची मॅरेथॉन रन

Published On: Jun 26 2018 12:10PM | Last Updated: Jun 26 2018 12:10PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूरचे दैवत व भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मॅरेथॉन रनची सुरुवात करण्यात आली. आजपासून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून उत्तम आरोग्यासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन रन दर मंगळवारी व शुक्रवारी सुरू रहाणार आहे. 

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अलंकार हॉलमधील शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलिस अधिक्षक संजय मोहिते,अप्पर पोलिस अधिक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधिक्षक सतिश माने उपस्थित होते. मॅरॅथॉन रन मध्ये पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक,उपनिरीक्षक असे 30 अधिकारी व 150 पो.कर्मचारी यांनी भाग घेतला होता.

या कार्यक्रमावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शिवाजी पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. याबद्दल विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.