Sun, Mar 24, 2019 04:46होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल आंदोलनाबाबत आज कृती समितीची बैठक

पर्यायी पूल आंदोलनाबाबत आज कृती समितीची बैठक

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 12:40AMकोल्हापूर: प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या बांधकामप्रश्‍नी सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी (दि.22) आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबत शनिवारी (दि.19) दुपारी 4 वाजता कृती समितीने महाराणा प्रताप चौक येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आंदोलनाची नियोजनबद्ध व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. त्यावर पर्याय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यातर्गंत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या बांधकामाची ‘वर्क ऑर्डर’ही काढण्यात आली आहे. मात्र, पावसाळा तोंडावर आल्याने ठेकेदार कंपनीने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. तांत्रिक दृष्ट्या हे काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर काहीही करा आणि सोमवारपासून काम सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने प्रशासनला दिला आहे. मंगळवारी शिवाजी पुलावर भिंत बांधून त्यावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी 4 वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंदोलनाची नियोजनबद्ध व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला कृती समितीच्या सदस्यांसह सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी केले आहे.