Sat, Apr 20, 2019 10:41होमपेज › Kolhapur › खूनप्रकरणी पिता-पुत्रास जन्मठेपेसह आर्थिक दंड

खूनप्रकरणी पिता-पुत्रास जन्मठेपेसह आर्थिक दंड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

भाटिवडे (ता. भुदरगड) येथे शेतात शेळ्या घुसल्याच्या कारणावरून महादेव यशवंत गुरव (वय 28) याच्यावर विळ्याने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी पिता-पुत्रांना जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. युवराज केरबा गुरव (वय 30) व केरबा दादू गुरव (55) अशी आरोपींची नावे आहेत. 

यशवंत गुरव व केरबा गुरव यांच्यात वाद सुरू होता. फिर्यादी यशवंत गुरव यांचा मुलगा महादेव हा 25 जून 2016 रोजी शेतातून गवताचा भारा व शेळ्या घेऊन घरी जात होता. यावेळी आरोपी युवराज गुरव आणि महादेव यांच्या किरकोळ वाद झाला. शेळ्या शेतात घुसल्याच्या कारणावरून युवराज व त्याचे वडील केरबा या दोघांनी महादेववर विळ्याने वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.