Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Kolhapur › मटका अड्ड्यांवर छापे; ४० हजारांची रोकड जप्त

मटका अड्ड्यांवर छापे; ४० हजारांची रोकड जप्त

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:05AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

येथे मंगळवार पेठेत दत्त कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकून मटका घेणार्‍या दोघांसह बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान,  पाडळकर मार्केट, लक्ष्मीपुरी, फुलेवाडी येथे छापे टाकले. चार एजंटांसह 18 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रोख 40 हजार रुपये, मटक्याचे साहित्यही जप्त केले आहे. 

दत्त कॉम्पलेक्समध्ये मटका अड्डा सुरू असल्याची माहिती शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना मिळाली होती. मंगळवारी दुपारी कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर पोलिसांनी छापा टाकला. मटका घेणार्‍या अजय लहू पाटील (वय 41, रा. जयसिंगपूर), विश्‍वास दादासो सावर्डेकर (52, रा. जवाहरनगर) यांच्यासह मटका खेळण्यासाठी आलेले जय बाळू लाखे (34, उद्यमनगर), इरफान वजीर मोमीन (73, साठमारी, मंगळवार पेठ), रवी कृष्णात पाटील (27, चिले कॉलनी), सनी राजेंद्र काळे (29, सुभाषनगर), सलिम खुदबुद्दीन पटेल (55, यादवनगर), महादेव धोंडिराम मोरे (52, मोरेवाडी), योगेश अच्युत घोरपडे (48, सिद्धार्थनगर), बसवान गंगाराम सकट (70, राजेंद्रनगर), महेश नंदू हळदीकर (26, टेंबलाई नाका) यांना ताब्यात घेण्यात आले. मटका बुकी मालक राजेंद्र गजानन बन्ने (रा. जुनी मोरे कॉलनी) व गाळा मालक धनपाल  यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. फुलेवाडीत मटका घेणारा प्रशांत चंद्रकांत चौगले (रा. फुलेवाडी) हा पसार झाला. 

 पाडळकर मार्केट परिसरात  राजेंद्र विलास बामणे (वय 49, रा. फुलेवाडी पहिला स्टॉप) याला, तर लक्ष्मीपुरीत उघड्यावर  महेश दिनकर पाटील (वय 44, रा. पाचगाव) या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघे बशीर आब्बास पटेकर (वय 70, रा. सोमवार पेठ) याच्यासाठी मटका घेत होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.