Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Kolhapur › आणूरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

आणूरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

Published On: Jan 13 2018 6:48PM | Last Updated: Jan 13 2018 6:47PM

बुकमार्क करा
म्हाकवे : प्रतिनिधी

आणूर ता.कागल येथील शुभम राजेंद्र चौगुले (वय 22 वर्ष) या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत कागल पोलीसात नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून व पोलीसातून मिळालेली माहीती अशी,आणूर ता.कागल येथील शुभम राजेंद्र चौगुले हा सकाळी दहा वाजता जनावरांना चारा टाकून आला होता. त्यानंतर घरात कुणालाही न सांगता तो बाहेर गेला. मात्र दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याने  आपट्याच्या झाडाला दोरी लावून गळफास घेतला. दोन दिवसानी बहिणीचे लग्न ठरविण्यात येणार होते. त्‍याच्या आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नाही. कागल पोलिस या घटनेचा अधिक तपास  करत आहेत.