Mon, Jun 17, 2019 02:09होमपेज › Kolhapur › पर्यटन विकासासाठी ‘मार्केटिंग’ व्हावे

पर्यटन विकासासाठी ‘मार्केटिंग’ व्हावे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यात पर्यटनाला प्रचंड संधी आहे. मात्र, त्याचे योग्य मार्केटिंग झाले पाहिजे, असे मत ‘एसओटीसी’ ट्रॅव्हल्स् सर्व्हिसेस कंपनीचे सेल्स हेड डॅनियल डिसूजा यांनी व्यक्त केले. कंपनीच्या वतीने ‘दर्शन’ या नव्या ब्रँडमध्ये देशभरातील 60 मंदिरांच्या टूर्स आयोजित केल्या जाणार आहेत, त्यात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

डिसूजा म्हणाले, कंपनीच्या वतीने धार्मिक पर्यटन करणार्‍यांसाठी ऑगस्टपासून ‘दर्शन’ हा बँ्रड सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईचाही समावेश असल्याने देशभरासह जगभरातूनही पर्यटक याचा लाभ घेतील. राज्यात पर्यटनाचे नेमके धोरण निश्‍चित झाले पाहिजे, त्यात सातत्य राहिले पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. त्याचा परिणाम पर्यटन विकासावर होत आहे. वेगवेगळ्या बाबींवर ‘फोकस’ करून पर्यटन विकास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासाठी योग्य मार्केटिंग अजूनही होत नाही, असे सांगत ते म्हणाले, राज्यात अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करणार्‍या आहेत.त्याचे बँ्रडिंग केले पाहिजे. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे, खास तो खाण्यासाठी पर्यटक आले पाहिजेत. त्या दृष्टीने कोल्हापुरी ‘फूड्स’चे ब्रँडिंग केले पाहिजे. जिल्ह्यासह राज्यात किल्ले आहेत. त्याचेही ‘फोर्टस्’ म्हणून ब्रँडिंग झाले पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत, की त्याचे योग्य ब्रँडिंग केले तर पर्यटन वाढीला चालना मिळेल. 

यावेळी कंपनीचे सरव्यवस्थापक लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ सरव्यवस्थापक (सेल्स) दीपराज जोशी, मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ उपस्थित होते.