Wed, Nov 14, 2018 14:30होमपेज › Kolhapur › व्यवस्थापन परिषद निवड प्रक्रिया मुदतीत वाढ

व्यवस्थापन परिषद निवड प्रक्रिया मुदतीत वाढ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

    कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणूक प्रक्रियेचाच भाग म्हणून राज्यपाल नियुक्त आणि कुलगुरू नियुक्त सदस्यांची निवड केली जाणार आहे. तसेच  सिनेट, विद्या परिषद, अभ्यासमंडळे या सर्वांचे प्रतिनिधित्व असणारे  व्यवस्थापन परिषद यातून तयार केले जाते. या सर्व निवड प्रक्रियेची मुदत 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबरअखेर मुदत होती.

शिवाजी विद्यापीठाची निवडणूक 17  नोव्हेंबरला झाली. निवडणुकीनंतर राज्यपाल आणि कुलगुरू नियुक्त सदस्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार नियुक्त सदस्यांची संख्या ही निवडून आलेल्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या नियुक्तींकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी राज्यपाल नियुक्त दोन सदस्यांची नावे जाहीर झाली आहेत. पण अजूनही मोठ्या प्रमाणावर नियुक्ती बाकी आहेत. तसेच धोरणे निश्‍चित करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे व्यवस्थापन परिषद (मॅनेजमेंट कौन्सिल) अद्याप निर्माण झालेले नाही. निवडून आलेल्या सदस्यांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषद ही संस्था काम करत असल्याने तिला शैक्षणिक वर्तुळात मानाचे स्थान आहे. आता या सर्व प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळाली आहे.