Tue, Mar 26, 2019 02:18होमपेज › Kolhapur › तीर्थक्षेत्र आराखड्याला मिळणार लवकरच मुहूर्त

तीर्थक्षेत्र आराखड्याला मिळणार लवकरच मुहूर्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर ट्विट करून आराखड्यातील 25 कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. खुद्द पालकमंत्री पाटील यांनी आराखड्याबाबत ट्विट केल्याने आता तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम लवकरच सुरू होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे. 

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गुजरात दौर्‍यावर असल्याने पुढील आठवड्यात आराखड्याला त्यांची मान्यता मिळण्याची शक्यता असून, मान्यता मिळताच सुरुवातीच्या विकासकामांसाठी 25 कोटींचा निधी वर्ग केला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्यातील प्रस्तावाला राज्याच्या मुख्य सचिवांनी 9 जूनला मंजुरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा आराखड्याचे सादरीकरण होऊन प्रत्यक्ष कामास अंमलबजावणी होणार होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसर्‍याच्या सुमारास आराखड्यांतर्गत कामाचे उद्घाटन होईल, असे जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. परंतु, मंजुरी मिळून पाच महिने उलटले तरी अद्याप कामासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्‍न कोल्हापूरवासीयांतून उपस्थित केला जात होता. कोल्हापूरवासीयांच्या या प्रश्‍नाला ट्विट करून पालकमंत्र्यांनी सोमवारी उत्तर दिले असून, आशावाद निर्माण केला आहे.