Wed, Feb 20, 2019 11:01होमपेज › Kolhapur › गणेशवाडी मध्ये एकाची गळफासाने आत्‍महत्‍या

गणेशवाडी मध्ये एकाची गळफासाने आत्‍महत्‍या

Published On: Mar 01 2018 8:44PM | Last Updated: Mar 01 2018 8:44PMकुरूंदवाड/प्रतिनिधी 

गणेशवाडी ता.शिरोळ येथील सुभाष भाऊ उदगावे (वय 54) यांनी जनावरांच्या गोठयात तुळीस गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी 12 च्या सुमारास उघडकीस आला. यामूळे परिसरात खळबळ माजली आहे.

घटनास्थळाजवळ मृत उदगावे यांनी मोबाईल, पैसे व एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत माझ्या मरणाला एक व्यक्ती जबाबदार असल्याचा मजकूर लिहून ठेवल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते आहे. मात्र पोलिसांनी त्या चिठ्ठीतील जबाबदार व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला. ही चिठ्ठी कुरूंदवाड पोलिसांनी  तपासासाठी जप्त केली आहे. याबाबतची वर्दी पवन शिरगावे यांनी कुरूंदवाड पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी 11वा. च्या सुमारास  सुभाष उदगावे हे जनावरांच्या गोठय़ाकडे जाऊन येतो असे घरी सांगुन गेले होते. बराच वेळ ते परत न आल्याने त्यांच्या पत्नीने 12 वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या गोठयात जाऊन पाहिले असता उदगावे यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेम कुमार केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ जगन्नाथ पाटील करीत आहेत.

दरम्यान मयत सुभाष उदगावे व जबाबदार व्यक्ती हे दोघे गणेशवाडी येथील एका पतसंस्थेत काम करत होते. आर्थिक देवानघेवानीतून हा प्रकार घडल्याची परिसरात उलट सुलट चर्चा रंगली आहे.