Tue, Mar 19, 2019 03:39होमपेज › Kolhapur › कुरुंदवाड पालिकेत ९ नगरसेवकांचा सभात्याग

कुरुंदवाड पालिकेत ९ नगरसेवकांचा सभात्याग

Published On: Feb 28 2018 8:58PM | Last Updated: Feb 28 2018 9:03PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरुंदवाड पालिकेच्या आज बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रभागातील विकासकामे विषय पत्रिकेवर न घेतल्याच्या कारणावरुन सहा नगरसेवकांनी सभात्याग केला. यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ३ नगरसेवकांनी तर अंदाजपत्रकाची सभा पुढे ढकलावी यावरुन विरोधी भाजपाच्या सर्व ६ नगरसेवकांनी सभा त्याग करून सभागृहाबाहेर निघून गेले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी सुचविलेल्या नावाला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवत राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती. 

पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठीही आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिजीत पाटील यांच्या नावाचे पत्र दिले आहे. अभिजीत पाटील यांनी वर्षभरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची विचारपूसही केली नाही म्हणून या तीन नगरसेवकांचा अभिजित पाटील यांच्या नावाला विरोध असून कोल्हापूर महानगरपालिकेची पुनरावृत्ती स्विकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान  घडण्याची दाट शक्यता आहे.

पालिकेच्या विषय पत्रिकेवर विकासकामांचे विषय न घेतल्याचा मुद्दा हाताशी धरत नगरसेवकांनी सभात्याग करून अभिजित पाटील यांच्या नावाला विरोध असल्याची नाराजी व्यक्त केल्याची चर्चा शहरातून रंगली आहे.