Tue, Jul 16, 2019 21:58होमपेज › Kolhapur › कस्तुरींना भावला ‘छंद प्रीतीचा’

कस्तुरींना भावला ‘छंद प्रीतीचा’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने आज कस्तुरी सभासदांसाठी ‘छंद प्रीतीचा’ या मराठी चित्रपटाचा शो आयोजित केला होता. कस्तुरी सभासदांनी चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला. तसेच अनेक कस्तुरींनी अनेक दिवसांनंतर असा अस्सल मराठमोळा चित्रपट पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त केली. सभासदांच्या आग्रहास्तव बुधवारी दुपारी पुन्हा चित्रपटाचा शो कस्तुरींसाठी राखीव ठेवण्यात आला असून, कस्तुरी क्लब कार्यालयातून तिकीट घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येकवेळी नवनवीन कार्यक्रम आणि मनोरंजनासह सभासदांसाठी भरभरून देणार्‍या  दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने ‘छंद प्रीतीचा’ या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता. कोल्हापूरचेच उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी छंद प्रीतीचा चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. मंगळवारी शाहू चित्रपट गृहाचा आवार कस्तुरी सभासदांच्या गर्दीने फुलला होता. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर कस्तुरींच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.  

कस्तुरी सभासद आरती यादव यांनी चित्रपट भावला, अनेकींनी चित्रपट कुटुंबासह पाहावा असा आहे. अनेक वर्षांनी असा मराठमोळा चित्रपट पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त केली. कस्तुरी सभासद स्मिता पोतदार यांनी अभिनेता सुबोध भावे यांनी आपली भूमिका अत्यंत उत्कृष्ट वठवली असून एकूणच सर्व कलाकारांनी चित्रपटातील भूमिकांना न्याय दिला आहे, असे 
सांगीतले. आज याठिकाणी चित्रपट निर्माते चंद्रकांत जाधव व प्रमुख कलाकार हर्ष कुलकर्णी उपस्थित होते.