Tue, Apr 23, 2019 22:30होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी गुळाबाबत  उद्धव ठाकरेंकडून दखल

कोल्हापुरी गुळाबाबत  उद्धव ठाकरेंकडून दखल

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:22AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरी गुळाचा नावलौकिक जगभर आहे. सध्या काही उत्पादकांकडून गुळाला पिवळा रंग प्राप्त होण्यासाठी कोल्हापुरी गुळामध्ये रासायनिक पावडरचा वापर केला जात आहे. हा वापर आरोग्यास हानीकारक असून कोल्हापुरी गुळाची गुणवत्ता यामुळे घसरत आहे. याची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याबाबत ठाकरे यांनी आमदार क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती आ. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 याबाबतच्या पत्रकात आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे, ‘गुळाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे यांनी गूळ उत्पादकांचे प्रबोधन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कर्नाटकातील काही भागातून या गुळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच त्या ठिकाणी गुळात साखर मिसळून कृत्रिम गोडवा वाढविण्याचे प्रयत्न होतात. याबरोबरच इतरत्र उत्पादित होणारा गूळ कोल्हापुरी गूळ या नावाने विकला जात आहे. याचा परिणाम कोल्हापुरी गुळावर होता आहे. गुळाचा दर्जा टीकविण्यासाठी उत्पादकांनी प्रयत्न करावेत. तसेच या उद्योगासमोर असणार्‍या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार आहोत.