Thu, Sep 20, 2018 02:54होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात गारांसह अवकाळी पावसाची हजेरी(Video)

कोल्‍हापुरात गारांसह अवकाळी पावसाची हजेरी(Video)

Published On: Apr 05 2018 5:38PM | Last Updated: Apr 05 2018 6:38PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

गेल्‍या काही दिवसांपासून उन्‍हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे शहरातील नागरिक या वाढत्‍या उष्‍म्‍याने त्रस्‍त झाले होते. त्‍यातच आज सकाळपासून वातावरणातील उष्‍म्‍यात कमालीची वाढ झाली होती. त्‍यातच आज गुरूवार सायंकाळी पाच वाजन्याच्या सुमारास आकाशात अचानक काळ्‍या ढगांनी गर्दी करायला सुरूवात केली . मोठ्‍या प्रमाणात वारा वाहायला सुरूवात झाली आणि मेघगर्जनेसह जोरदार गारांच्या पावसाला सुरूवात झाली. 

गेल्‍या आठ दिवसांपासून उष्‍म्‍याने त्रस्‍त झालेल्‍या शहरवासीयांना या पावसामुळे सुखद गारवा मिळाला. काहींनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. बालचमुंनी पावसाच्या वर्षावाबरोबर पडणार्‍या गारा गोळा करण्याची मजा लुटली. तर या अचानक आलेल्‍या पावसामुळे फेरीवाल्‍यांची मात्र तारांबळ उडाली. तसेच शहरातील सकल भागात या पावसामुळे पाणी साठले होते. तर काही ठिकानी या जोरदार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना घडल्‍या आहेत.