Wed, Feb 26, 2020 02:35होमपेज › Kolhapur › पानसरे हत्‍या : विरेंद्र तावडेचा जामीनासाठी अर्ज 

पानसरे हत्‍या : विरेंद्र तावडेचा जामीनासाठी अर्ज 

Published On: Dec 05 2017 5:12PM | Last Updated: Dec 05 2017 5:12PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येतील संशयित डॉ. विरेंद्र तावडे याच्यावतीने मंगळवारी न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला. अ‍ॅड. स्मिता शिंदे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. यावर शुक्रवार २२ डिसेंबरला सरकारी पक्षातर्फे म्हणणे मांडण्यात येणार आहे. 

कॉम्रेड पानसरे हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरुन डॉ. विरेंद्र तावडे याला ३ सप्टेंबर २०१६ रोजी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. डॉ. तावडे पुण्यात झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील मुख्य संशयित आहे. डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणार्‍या सीबीआयचा साक्षीदार संजय साडविलकर यांच्या जबाबातून डॉ. तावडेचे नाव पानसरे हत्येत पुढे आले होते. यामुळे तावडेला अटक झाली होती. त्‍याला कोल्हापुरात १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्‍यानंतर पुन्हा पुण्यात रवानगी करण्यात आली. डॉ. तावडेच्यावतीने पहिल्यांदाच जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे.