Sat, Aug 17, 2019 16:18होमपेज › Kolhapur › पुणे- बेंगलोर महामार्गावर मालवाहतूकदारांचे चक्‍काजाम आंदोलन 

पुणे- बेंगलोर महामार्गावर मालवाहतूकदारांचे चक्‍काजाम आंदोलन 

Published On: Jul 27 2018 6:03PM | Last Updated: Jul 27 2018 6:03PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी 

सातत्याने होणार्‍या डिझेलच्या दरवाढीच्या प्रमाणात भाडेवाढ न झाल्‍याने देशभरातील मालवाहतूकदार संघटनेने संपाचे हत्‍यार उगारले आहे. यामुळे देशभरात मालाच्या वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्‍यातच आज पुणे - बेंगलोर राष्‍ट्रीय महामार्गावर संतप्त वाहतूकदार संघटनेच्या आंदोलकांनी माल वाहतूक करणार्‍या ट्रकच्या टायरमधील हवा सोडून चक्‍काजाम आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्‍या होत्‍या. 

गेल्‍या काही दिवसांपासुन देशभरात मालवाहतूकदारांचे आंदोलन सुरू आहे. या दरम्‍यान आज संतप्त संपकर्‍यांनी पुणे - बेंगलोर राष्‍ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडीजवळ माल वाहतूक करणार्‍या ट्रकना आडवत ट्रकच्या टायरमधील हवा सोडून चक्‍का जाम आंदोलन केले. अचानक केलेल्‍या या आंदोलनामुळे पुणे - बेंगलोर महामार्गावरील प्रविण पेट्रोल पंपापासुन सरणोबतवाडीपर्यंत ट्रक आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला होता.