Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकर... सज्ज व्हा अनलिमिटेड शॉपिंगसाठी

कोल्हापूरकर... सज्ज व्हा अनलिमिटेड शॉपिंगसाठी

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:39AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरकरांना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क येथे हे फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले राहणार आहे. फेस्टिव्हलमध्ये मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले असून, बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ.एम. आयोजित ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’साठी रॉनिक वॉटर हिटर सिस्टीम आणि पितांबरी  रुचियाना हे सहप्रायोजक आहेत. मनसोक्त खरेदीसोबत येथे नानाविध पदार्थांची रेलचेल असल्याने हे फेस्टिव्हल कोल्हापूरकरांसाठी पर्वणीच असते. 

नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या उत्साही वातावरणाचा पुरेपूर आस्वाद लोकांना सहकुटुंब येथे घेता येणार आहे. चमचमीत खाद्यपदार्थांसोबत दर्जेदार कंपन्यांची उत्पादने आणि भरघोस सवलती हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य आहे.

महिला व तरुणींसाठी क्रॉकरी, सौंदर्यप्रसाधने, फॅन्सी ड्रेस, तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य, तर ज्येष्ठांसाठी आयुर्वेदिक प्रोडक्ट, कपडे आदी बरेच काही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. 
गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली

कुटुंबासाठी लागणार्‍या गृहोपयोगी वस्तू लोकांना एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, लोणची, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमेटिशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्याचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, पिकनिक टेबल, लहान मुलांसाठी होम रिव्हाईज, क्वीक हीलकडून फ्री लॅपटॅप चेकिंग असणार आहे. 

शाकाहारी अन् मांसाहारी पदार्थही

शाकाहारी पदार्थांसोबतच मांसाहारी पदार्थांचीही रेलचेल असणार आहे. माशांपासून तयार केलेले विविध पदार्थ असणार आहेत. झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, वडा-कोंबडा, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर फेस्टिव्हलमध्ये असेलच, याशिवाय हैदराबादी, लखनवी बिर्याणीचाही आस्वाद घेता येणार आहे. शाकाहारीमध्ये डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, झुणका-भाकर, व्हेज पुलाव, आइस्क्रिम आदी चमचमीत पदार्थांचे स्टॉलही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. तसेच घरगुती घनकचरा व्यवस्थापनाची माहिती उपलब्ध असणार आहे. गृहोपयोगी स्टॉल बुकिंगसाठी सनी 9765566413, अमोल 9765566377 आणि तसेच फूड स्टॉलसाठी 8805007724, 8805024242 या मोबाईल क्रमांकांशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले 
आहे.