Sat, Jun 06, 2020 11:58होमपेज › Kolhapur › गंजीमाळ येथील जुगार अड्ड्यावर छापा

गंजीमाळ येथील जुगार अड्ड्यावर छापा

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 1:10AM कोल्हापूर : प्रतिनिधी 

टिंबर मार्केटजवळील गंजीमाळ येथे चालणार्‍या तीनपानी जुगार अड्ड्यावर राजवाडा पोलिसांनी छापा टाकून 14 जणांना ताब्यात घेतले. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली. गंजीमाळ येथील प्रल्हाद म्हादू कांबळे (वय 52) याच्या घरात हा जुगार अड्डा सुरू होता. रोख दहा हजार रुपयांसह 23 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरमालक प्रल्हाद कांबळेसह 15 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली. 

संदेश दिनकर कांबळे (वय 48, रेणुकानगर, पाचगाव), कपिल सुरेंद्र चव्हाण (30, वारे वसाहत),  राजू पांडुरंग करपे (51), धीरज अनिल भाटे (37 ),  राजेंद्र शामराव कांबळे (35), राकेश दगडू कांबळे (33), संग्राम नंदकुमार जरग (30),  नामदेव बबन भाले (54), प्रवीण मच्छिंद्र पाथरूट (35), विशाल संतराम कांबळे (40), अमित संभाजी टिपुगडे (28), सोमेश सुहास साठे (25), (सर्व रा. गंजी माळ, टिंबर मार्केट), सागर दीपक भोसले (32, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट), कृष्णात गणपती सोरटे  (45, आरे, ता. करवीर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ चौगले, सचिन देसाई, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे, शाहू तळेकर यांनी कारवाई केली.