Wed, Apr 24, 2019 11:47होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : शाहूपुरी, गंगावेस कुंभार गल्‍लीतून वाहतूक बंद

कोल्‍हापूर : शाहूपुरी, गंगावेस कुंभार गल्‍लीतून वाहतूक बंद

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 13 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गणेश आगमनासाठी शहरातील कुंभार गल्‍लींमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. शाहूपुरी कुंभार गल्‍ली, गंगावेस कुंभार गल्‍ली, बापट कॅम्प परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने एकेरी मार्ग, नो पार्किंगचे पालन भाविकांनी करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

 प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग 

पापाची तिकटी, गंगावेस परिसर 

पापाची तिकटी ते बुरूड गल्‍ली जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. 

 शाहू उद्यान गंगावेस ते कुंभार गल्‍ली जाणार्‍या वाहनांना शाहू उद्यानजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

3. गंगावेस ते पापाची तिकटी व माळकर तिकटी चौक मार्गावर कोणतेही वाहन थांबविता येणार नाही.

 शाहूपुरी कुंभार गल्‍ली

 शाहूपुरी कुंभार गल्‍लीत जाणार्‍या सर्व वाहनांना नाईक अँड नाईक कंपनीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. 
 फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीजकडून येणार्‍या वाहनांना रिलायन्स मॉल याठिकाणी प्रवेश बंद असेल. 
 गवत मंडई चौकातून कुंभार गल्‍लीकडे जाणारी सससर्व वाहनेे गवत मंडई चौकातून पुढे जाणार नाहीत. 

 नो पार्किंग झोन
गवत मंडई येथील पाचव्या गल्‍लीतील चौकातून सर्व बाजूस 50 मीटरपर्यंत कोणतेही वाहन थांबविता येणार नाही. 

 पार्किंग व्यवस्था 

शाहूपुरी कुंभार गल्‍लीत सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती आणण्यासाठी येणार्‍या मंडळांनी आपली वाहने आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल पटांगणावर पार्किंग करावीत, असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे.  

 राजारामपुरीत पर्यायी मार्ग

राजारामपुरीतील मुख्य मार्गावरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची मिरवणूक गुरुवारी सायंकाळनंतर सुरू होते. यामुळे यासाठी पर्यायी मार्ग शहर वाहतूक शाखेने दिले 
आहेत. 

 बागल चौकातून पुढे जाणार्‍या वाहनधारकांनी शाहू मिल चौकातून राजारामपुरी 14 व्या गल्‍लीकडे जावे
 टेंबलाईवाडी रेल्वे उड्डाणपुलाकडून येणारी वाहने ताराराणी चौक, हायवे कँटिन, शिवाजी विद्यापीठ मार्गे येतील. 
 कमला कॉलेज बस रूटमार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच परीख पूल, पाचबंगला, टाकाळा, साईक्स एक्स्टेन्शन हे मार्ग वाहतुकीस खुले राहतील.