Sun, Mar 24, 2019 17:01होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात आज रमजान ईद

जिल्ह्यात आज रमजान ईद

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

संयम, सामंजस्य व त्याग याची शिकवण देणार्‍या रमजान महिन्याचा शेवट रमजान ईदने साजरा होतो. शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने रमजान ईद शनिवारी (दि. 16) साजरी केली जाणार आहे, अशी माहिती  चाँद कमिटीच्या वतीने देण्यात आली. ‘रमजान ईद’साठी अवघे कोल्हापूर शहर सज्ज झाले आहे. शहरात ईदनिमित्त शनिवारी सकाळी 9.30 वाजता मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सामुदायिक नमाज पठण केले जाणार आहे. मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज पठण व खुतबा पठण करणार आहेत कमिटीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत कोल्हापूरसह आजरा, जत, सोलापूर आदी शहरांशी संपर्क साधून चंद्रदर्शनाची साक्ष घेण्यात आली. साक्ष मिळाल्याने उलमा कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी शनिवारी ईद साजरी करण्याचा निर्णय दिला. यावेळी मौ. बशीर नायकवडी, इरफान कासमी, नाझिम पठाण, आमीन अथणीकर, अब्दुल राजिक, रऊफ नाईकवडे, मुफ्ती ताहीर बागवान, फजले करीम शेख, तौफिक सैय्यद, तौफिक गडकरी, साजिद शेख, मोहसिन बागवान, शहजादा पटवाली, जफर अन्वर, मिर शिकारी, सोहेल बागवान व मुस्लिम बोर्डिंगचे सर्व संचालक उपस्थित होते. ईदच्या पूर्वसंध्येला महिला व मुलींची शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. ईद फेस्टिव्हलमध्येही रात्री उशिरापर्यंत गर्दी आणि उत्साह दिसून आला.